|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.6° से.

कमाल तापमान : 27.86° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.07 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.86° से.

हवामानाचा अंदाज

26.55°से. - 30.67°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 29.65°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.06°से. - 29.94°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.13°से. - 30.01°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.62°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.11°से. - 28.8°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home » महाराष्ट्र » महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र करायचे का?

महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र करायचे का?

देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत घणाघात, सचिन वाझेला अटक करण्यासाठी भाजपा आक्रमक, विधानसभा दिवसभरासाठी तहकूब,
मुंबई, ९ मार्च – मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या सचिन वाझेला तातडीने निलंबित करून अटक करावी, या मागणीसाठी भाजपाच्या सदस्यांनी आज मंगळवारी विधानसभेत उग्र रूप धारण केले. यामुळे विधानसभेचे कामकाज आठ वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. महाराष्ट्राला आत्महत्यांचे केंद्र बनवायचे आहे का, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चढविला. ‘यह सरकार खुनी है,’ या जयघोषाने संपूर्ण विधानसभा दिवसभर दुमदुमली.
अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेत जमा होत दिवसभर भाजपा सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यातच दादरा-नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास एसआयटीद्वारे करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी दाबल्याचा आरोप करीत, त्याचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
यानंतर, महाराष्ट्राला पर्यटनाऐवजी आत्महत्यांचे मुख्य स्थळ बनवायचे आहे का, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. विधानभवनात असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात येणे टाळले. इतकेच नव्हे तर, विरोधकांचा आक्रमक अवतार पाहून अध्यक्षांच्या दालनात वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्येही ते सहभागी झाले नाहीत. सभागृहात शिवसेनेच्या वतीने अनिल परब आणि भास्कर जाधव यांनी आटोकाट सरकारला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सरकारच उघडे पडले.
चार महिन्यांपासून स्कॉर्पियो वाझेकडेच प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन ठेवण्यात आलेल्या वाहनाचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा विषय उपस्थित केला.
मनसुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात फार धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे व्यवसायाच्या निमित्ताने माझे पती मनसुख यांच्या परिचयाचे होते. नोव्हेंबर २०२० पासून आमची गुन्ह्यात सापडलेली स्कॉर्पियो वाझेकडे होती. ५ फेब्रुवारी रोजी वाझेच्या चालकाने ही गाडी परत केली. २६, २७ आणि २८ फेब्रुवारीला आपले पती मनसुख, वाझेबरोबरच गुन्हे शाखेत चौकशीसाठी गेले होते. त्यांच्याचसोबत परत आले. २ मार्चला वाझेच्याच सांगण्यावरून त्यांनी वकील गिरी यांच्याकडे जाऊन पोलिस आणि मीडिया हे आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार लिहून घेतली आणि ती मुख्यमंत्र्यांसह अनेकांकडे पाठविली. ३ मार्चला मनसुख यांनी आपल्याला अटक करवून घेण्यास वाझे म्हणत असल्याचे सांगितले. दोन-तीन दिवसांत जामिनावर तुला सोडवून घेतो, असे आश्‍वासनही वाझेने दिल्याचे ते म्हणाले. ४ मार्चला मनसुख यांनी माझ्या भावजयीशी बोलणे करून वकिलाकडून अटकपूर्व जामिनासाठी बोलणे करण्यास सांगितले.
परंतु, आपल्यावर गुन्हा दाखल नसताना न्यायालय अटकपूर्व जामीन देणार नाही, असे तिला वकिलांनी सांगितले. शेवटी, आपल्या पतीची हत्या वाझेनेच केली असल्याचा दावा मनसुख यांच्या पत्नीने केल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
परब यांनी काढला डेलकरांचा विषय फडणवीस यांच्या मागणीनंतर लगेच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दादरा-नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा विषय आणला. मुंबईत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. मनसुख यांच्या हत्येप्रमाणेच डेलकर आत्महत्येचाही तपास व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले.
डेलकरांची सुसाईड नोटच फडकावली यावेळी फडणवीस यांनी डेलकर यांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीची प्रत दाखवली. यात कोणाचेही नाव नाही, असे ते म्हणाले. नाना पटोले यांनी अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या त्रिस्तरीय सुरक्षेला भेदून तेथे गाडी गेली कशी, असा सवाल केला. फडणवीस यांच्याकडे यातला सीडीआर गेला कसा, असेही ते म्हणाले. एटीएसला जगात नावलौकिक आहे. त्यांच्याकडून तपास काढून तो केंद्र सरकारकडे सोपविण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे पटोले म्हणाले.
ेशमुखांच्या चुकीसाठी फडणवीसांनी खडसावले काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राजेशकुमार श्रीवास्तव नावाच्या मध्यप्रदेशच्या एका आयएएस अधिकार्‍याने आत्महत्या केली. मध्यप्रदेशात भाजपाचे शासन आहे.
तेथे आपल्याला न्याय मिळणार नाही, असे वाटल्यानेच त्यांनी आत्महत्येसाठी महाराष्ट्राची निवड केली, असे अनिल देशमुख यावेळी बोलताना म्हणाले. मात्र, गृहमंत्री सभागृहात धादांत खोटे बोलत आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडसावले. प्रत्यक्षात श्रीवास्तव हे मध्यप्रदेशचे नसून, छत्तीसगडचे अधिकारी होते आणि तिथे कॉंगे्रसचे सरकार आहे, ही बाबही फडणवीस यांनी निदर्शनात आणून दिली.
चौकशी कराच
कॉंगे्रसचे नाना पटोले यांनी यावेळी, या प्रकरणातील सीडीआर फडणवीस यांच्याकडे कसे गेले, याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी, चौकशी कराच, असे आव्हान दिले. सत्ताधारी आणि विरोधकांमधला हा सामना बराच वेळ चालला होता.

Posted by : | on : 10 Mar 2021
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g