किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल– हवामान विभागाचा अंदाज,
पुणे, (२७ डिसेंबर) – राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. पुणे, मुंबईसह राज्याच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका असून ही थंडी नववर्षात देखील कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय नववर्षाचे स्वागत थंडीसोबत धुके आणि रिमझिप पावसाने होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात असलेली थंडीची लाट आणि काही भागात सुरू असलेला पाऊस आणि काही भागात सुरू असलेली बर्फवृष्टी यामुळे राज्यातदेखील तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारपासून पुन्हा तापमानात घट होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ३०-३१ डिसेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात फारशी घट होणार नसली तरी थंडी मात्र जाणवेल. राज्यावर सध्या कुठलीही हवामान यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे २९ तारखेपर्यंत हवामान कोरडे राहून पुढील दोन दिवस पहाटे हलके धुके पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३० डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत विंड इंटरॅक्शनमुळे वायव्य व मध्य भारत तसेच महाराष्ट्राच्या उत्तरी भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. हे हवामान हळूहळू पूर्वेच्या दिशेने सरकत राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रावरून विदर्भाच्या दिशेने पुढे जाईल. यामुळे नवीन वर्षात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळ ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.