किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– उद्धव ठाकरे गटाची शक्ती कमी झाल्याचा काँग्रेसचा दावा,
मुंबई, (२८ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने २३ जागांची मागणी केली होती. ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने खूप जागा जिंकल्या असल्या तरी, आता या पक्षात फूट पडल्याने उद्धव ठाकरे गटाची शक्ती कमी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
शिवसेनेची लोकसभेच्या २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाले. त्यांचे अनेक नेते सत्तापक्षासोबत गेले. त्यामुळे काँग्रेस सर्वांत जुना पक्ष आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ‘इंडि’ आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणे गरजेचे आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात, पण सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाची २३ जागांची मागणी खूप जास्त आहे.
आज दिल्लीत बैठक
लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या अनुषंगाने शुक्रवारी महाराष्ट्रातील नेत्यांची वरिष्ठांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेमक्या कोणत्या जागा लढेल, याबाबत चर्चा होणार आहे. शुक्रवारी दोन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आमच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सुकाणू समितीच्या सदस्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडेल. या बैठकीत जागांच्या संदर्भात चर्चा होईल. सध्या जागांसाठी दावे केले जात असले, तरी भाजपाला रोखायचे असल्यास सर्वांनी एकत्रित येऊन लढाई लढायला हवी, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.