किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– हवामान विभागाचा अंदाज,
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – राज्यातील तापमानात घट होत असल्याने उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे. राज्यासह देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात तुलनेने गारठी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात काही भागांत पावसाची रिमझिम सुरूच राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. केरळच्या समुद्र किनार्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागांत हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. तिथेच, काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. आता नोव्हेबर उजाडताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने नोव्हेंबरसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, कमाल आणि किमान तापमानात घट होणार आहे, पण थंडी कमी राहणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही किमान तापमान अधिक राहील. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल. नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाण्यासह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे. अल् निनोच्या प्रभावामुळे देशातील बहुतेक भागांत नोव्हेंबरमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील काही भागांत, उत्तर-पश्चिमचा बहुतांश भाग आणि पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज असून, या भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.