किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– ५० लाखांची खंडणी मागितली,
परळी, (११ जुलै) – छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला ५० लाख रुपये द्या, नाही तर तुम्हाला जीवे मारील, अशी धमकी फोन करणार्या व्यक्तीने दिली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
छगन भुजबळ सोमवारी पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री एका व्यक्तीने फोन करून मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंडे यांच्या बीडमधील परळी येथील निवासस्थानी लॅण्डलाईनवर धमकीचा फोन आला होता.
भुजबळांना धमकी देणारा अटकेत
छगन भुजबळ सोमवारी पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणार्याने भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. धमकी देणार्याने स्वतःचे नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.