किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– सार्वजनिक आरोग्य विभागाचा आदेश जारी,
मुंबई, (११ जुलै) – आता खाजगी कार्यायांतही तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. गुटख्याच्या निर्मिती, विक्री आणि व्यसन यावर बंदी घालणारे महाराष्ट्र देशात पहिलेच राज्य होते. नंतर या राज्याचे अनुकरण इतर राज्यांनी केले. प्रत्यक्षात देशभरात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात घट झालेली नाही. साहजिकच तंबाखूच्या व्यसनाने मृत्युमुखी पडणार्यांचा आलेख चढताच आहे. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालय व उपहारगृहांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतही तंबाखूजन्य पदार्थ वापरास बंदी आहे. नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. तंबाखूमुक्त परिसर करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णयही झाला आहे. जनसामान्याांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ मोहिमेद्वारे शासकीय इमारतींची साफसफाई करून शासकीय कायालये व परिसर हा तंबाखूमुक्त परिसर म्हणून जाहीर केला आहे.