किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, ५ जानेवारी – मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी सोमवारी रात्री फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करून, त्याची तुरुंगात रवानगी केली. त्यांनी डबेवाल्यांच्या नावावर कर्ज घेतले मात्र पैसे त्यांना दिलेच नाही. त्यांच्याविरोधात याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अटकेबाबत डबेवाला वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सुभाष तळेकर यांना अटक करून, विक्रोळी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांनी ५ वर्षांपूर्वी डबेवाल्यांची फसवणूक केली होती. त्यांच्या नावावर कर्ज घेतले होते. मात्र, त्यांना पैसे दिलेच नसल्याचे स्पष्ट झाले होते. वसुलीच्या नोटिसा आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
डबेवाल्यांच्या नावावर कर्ज उचलण्याचे हे प्रकरण २०१५ मधील आहे. सुभाष तळेकर आणि त्यांच्या काही सहकार्यांनी डबेवाल्यांना दुचाकी मोफत देण्याचे प्रलोभन दिले होते. त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले आणि इतर दस्तावेजही गोळा केले. त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्यादेखील घेतल्या होत्या. मात्र, बरेच दिवस होऊनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी दुचाकींची मागणी केली. काही तक्रारदारांकडे नोटिसा आल्या. तुम्ही कर्ज घेतले असून, परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसांत नमूद केले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तळेकर यांच्याविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.