किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, ८ फेब्रुवारी – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावला. विशेष एनआयए न्यायालयाने जामीन नाकारला असल्याने, आम्ही त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत काही लोकांनी प्रक्षोभक भाषणबाजी करून, हिंसाचाराला प्रोत्साहन दिले होते. या परिषदेला काही शहरी माओवादी नेत्यांचाही पाठिंबा होता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानंतर, अनेकांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नवलखाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या अर्जावर आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. एनआयए न्यायालयाचा निकाल आम्ही वाचला आहे. त्यामुळे आम्ही त्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.