किमान तापमान : 30.35° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 2.18 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.83°C - 32.99°C
scattered clouds28.46°C - 30.81°C
scattered clouds28.71°C - 30.34°C
scattered clouds28.52°C - 30.28°C
broken clouds28.5°C - 30.95°C
overcast clouds28.71°C - 30.51°C
light rain– पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन,
मुंबई, (०२ जानेवारी) – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.
राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय बनसोडे आदी उपस्थित होते. युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. नाशिक येथे १२ ते १६ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी १०० युवांचा संघ, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण सहभागी होणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर हा समारंभ होणार आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे.