किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (०६ जुलै) – राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार, मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातार्यातील घाटमाध्यावरही पावसाचा जोर वाढलेला असेल. तर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही पावसाची दमदार हजेरी असेल अशी शक्यात वर्तवली जात आहे. विदर्भातही उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार १० जुलैपर्यंत दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ११ आणि १२ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. दुसरीकडे, आयएमडीने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सीतामढी, शिवहर, दरभंगा, जमुई, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज आणि बांका या नऊ जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पाटणासह इतर जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यूपीमध्ये आज आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. आजही अनेक जिल्ह्यांत पाऊस पडत असल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मान्सूनने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दोन्ही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने गोव्यासाठी ’रेड’ अलर्ट जारी केला असून, गुरुवारी किनारपट्टीच्या राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात पुढील ३, ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी’ असेल. इथं राज्यात बर्याच काळानंतर देण्यात आलेल्या रेड अलर्टकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. फक्त रायगडचट नव्हे तर रत्नागिरी भागातही अती मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे.