किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 24.03° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल-जीवाला धोका असल्याचा पोलिसांचा दावा,
प्रयागराज, (१७ एप्रिल) – उत्तरप्रदेशातील गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी प्रयागराज शहरातील नैनी तुरुंगातून प्रतापगड तुरुंगात हलविण्यात आले. तिघांच्याही जीवाला धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
सनी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तिघांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता रुग्णालयात तपासणीसाठी नेत असताना अतिक व अशरफवर तब्बल २० ते २२ गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पत्रकारांच्या वेशात आलेल्या आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. परंतु, नैनी तुरुंगात त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या शक्यतांवरून सोमवारी दुपारी प्रतापगड तुरुंगात हलविण्यात आले.
प्रसिद्धी की अन्य काही…
तिन्ही आरोपींनी अतिक आणि अशरफची हत्या केवळ गुन्हेगारी जगात प्रसिद्ध होण्यासाठी अर्थात् अशाप्रकारे नाव कमावण्यासाठी केल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. परंतु, तो उपाय अंमलात आणण्यासाठी दोघा भावांनाच लक्ष्य का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनाक‘मामागे अन्य मोठा सूत्रधार तर नाही ना, असे विचारणा होत आहे. याशिवाय दोघांच्या हत्याचे पुरावे कायमचे संपविण्यासाठी तिन्ही आरोपींना जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.