किमान तापमान : 29.22° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 6.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.71°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश-गोरखपूरमध्ये १० हजार कोटींच्या १८ प्रकल्पांचा शिलान्यास व लोकार्पण,
गोरखपूर, (१३ मार्च) – जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार वाढतो, तेव्हा देव अवतार घेतात आणि अत्याचार करणार्या दुष्टांचा नायनाट करतात. असे भगवान श्रीकृष्णाने दुष्टांसोबत केले होते. त्याच प्रमाणे आज उत्तरप्रदेशात सर्वसामान्य जनता आणि सज्जनांवर अन्याय, अत्याचार करणार्याचा नायनाट योगी आदित्यनाथ करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले.
गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत १० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रामुख्याने उपस्थित होते. दुष्टांचा नायनाट करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्याचा आदर्श निर्माण करून समाजाला दिलासा देत आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले की, २०२४ सालापर्यंत उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे होतील. २०२४ अखेरीस येथे पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे काम केवळ पायाभूत सुविधांवर खर्च केले जाणार आहेत. शेतकर्याचा मुलगा गोरखपूरमध्ये इथेनॉल पंप सुरू करू शकेल. पेट्रोलचा दर १२० रुपये प्रतिलिटरपर्यंत जाईल, तेव्हा इथेनॉल ६० रुपये प्रतिकिलो असेल. यामुळे आमच्या बाईक्स, ऑटो, कार आणि इतर वाहने रस्त्यांवर बेधडक धावतील. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल, असेही गडकरी म्हणाले.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांच्या कामांची प्रशंसा केली. राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांना गती देऊन त्याला एका उंचीवर नेऊन पोहोचविण्याचे सारे श्रेय गडकरी यांना जाते. येथे होणार्या लोकार्पण व शिलान्यास कामांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, रामजानकी मार्गाच्या निर्मितीला गती मिळाल्यामुळे रामायण काळातील घटनांचे स्मरण होते. २१ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २७ किमी लांब जंगल कौडिया-जगदीशपूर मार्ग विकासाचा नवा इतिहास लिहील.