किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मंगळवारी तृणमूलच्या निदर्शनात सहभागी होणार,
कोलकाता, (३० सप्टेंबर) – तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी ३ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार नाहीत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीने अभिषेक यांना समन्स बजावले होते. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे ईडीवर निशाणा साधला. जगातील कोणतीही शक्ती आपल्याला दिल्लीत जाण्यापासून रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. खरे पाहता, शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३ ऑक्टोबरला तपास संस्थेसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या समन्वय बैठकीदरम्यान आणि आता ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुद्यावरून दिल्लीत निदर्शने होणार आहेत त्याच दिवशी आपल्याला ईडीने बोलावले आहे, असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. जगातील कोणतीही शक्ती मला पश्चिम बंगालमधील लोकांसाठी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच आपण २ आणि ३ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार्या निदर्शनात सहभागी होणार आहोत, असे त्यांनी सांगितले. याआधी १३ सप्टेंबर रोजी सॉल्ट लेक येथील ईडी कार्यालयात अभिषेक बॅनर्जी यांची नऊ तास चौकशी करण्यात आली होती. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, विरोधी पक्षांच्या बैठकीला येण्यापासून रोखण्यासाठी ईडीने हा दिवस निवडला आहे. ईडी आणि सीबीआय या प्रकरणाचा पाठपुरावा ‘पिक अॅण्ड चूज’ या आधारावर करीत आहे, असा आरोपही अभिषेक यांनी केला.