किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 29.64° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.64° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसहा लाख रायफलींचे होणार उत्पादन,
लखनौ, २४ नोव्हेंबर – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्यापूर्वीच अमेठी हे एके-२०३ रायफलींचे उत्पादन केंद्र होणार आहे.
अमेठी येथे कारखाना उभारून सहा लाख एके-२०३ रायफलींचेउत्पादन घेण्यासाठी होऊ घातलेल्या भारत आणि रशियातील सौद्याला संरक्षण मंत्रालयाने आज बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारत दौर्यापूर्वी संरक्षण खरेदी समितीने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.
भारत व रशियातील संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय लष्कराच्या जवानांसाठी सहा लाख एके-२०३ रायफली अमेठीच्या कारखान्यात तयार केल्या जातील. एके-२०३ ही एके-४७ रायफलीची आवृत्ती असून, भारतीय लष्करी जवानांकडे असलेल्या इन्सास रायफलीची जागा घेणार आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि इन्फन्ट्री रेजिमेंट्सकडून कलाश्निकोव्ह रायफलीचा सर्वाधिक वापर केला जातो, हे विशेष. भारत व रशियात झालेल्या सौद्याप्रमाणे ६,०१,४२७ एके-२०३ रायफली अमेठीतील नवीन कारख्यानात तयार केल्या जातील. भारत व रशियात झालेल्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा भाग म्हणून सुरुवातीच्या ७० हजार रायफलींसाठी रशियात तयार झालेल्या सुट्या भागांचा वापर केला जाणार आहे.
३२ महिन्यांत जवानांना ७० हजार रायफली
उत्पादन सुरू झाल्यापासून ३२ महिन्यांत लष्करी जवानांच्या हाती ७० हजार रायफली दिल्या जाणार आहेत.
अचूक वेध घेण्याची क्षमता
एके-२०३ रायफलींत अचूक वेध घेण्याची क्षमता आहे तसेच याच्या नळीचे आयुष्यही मोठे आहे. या रायफलींच्या मॅग्झिनमध्ये काडतुसे दिसू शकतील, अशी खाच ठेवण्यात आली आहे. याचा दस्ता दुमडून ठेवणे शक्य आहे.