किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.05° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-६७ टक्के ड्रिलिंग पूर्ण, युद्धस्तरावरील कामाने मोहिमेत प्रगती,
उत्तरकाशी, (२३ नोव्हेंबर) – उत्तराखंडमधील सिलकॅरा बोगद्यात मागील ११ दिवसांपासून अडकलेल्या सर्व ४१ कामगारांच्या सुटकेचा मार्ग दृष्टीस आला आहे. ड्रिलिंगचे ६७ टक्के काम पूर्ण झाल्याने बचाव मोहिमेत प्रगती असताना आज गुरुवारी मध्यरात्री वा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सर्व जण खुल्या वातावरणातील मोकळा श्वास घेतील, असा विश्वास बचाव यंत्रणांनी व्यक्त केला.
पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुळबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ४२ मीटरपर्यंत मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्यात आले. ड्रिलिंगचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून, आणखी सहा मीटर पुढील टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. गुरुवारी मध्यरात्री वा शुक्रवारी पहाटे पर्यंत सर्वांची सुटका करण्यात यश येण्याचा विश्वास आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाकडून ऑगर बोरिंग मशीनद्वारे आतापर्यंत ४२ मीटर पाईप टाकण्यात आले आहेत. व्हर्टिकल रेस्क्यू टनल निर्मितीसह बोगद्याच्या बारकोट बाजूनेही खनन होत आहे. यात चार स्फोट केल्याने ९.१० मीटरचा मार्ग तयार झाल्याचे यंत्रणांच्या सूत्राने सांगितले.
संपूर्ण मोहिमेसाठी अमेरिकन मशीन्ससह मुंबई, इंदूर, गाझियाबाद येथून आधुनिक यंत्र मागविण्यात आले आहेत. या कामात एसजेव्हीएनएल, आरव्हीएनएल, बीआरओ, ओएनजीसी, एसडीआरएफ, एनडीआरएफ आदींचा सहभाग मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितले की, बोगद्यातील ४० मीटर ते ५० मीटरदरम्यानचा भाग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा टप्पा पार केल्यानंतर अधिक आत्मविश्वास प्राप्त होईल. या मोहिमेत कोणतेही अडथळे न आल्यास आणि कामाची गती कायम राहिल्यास बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी आनंदाची बातमी मिळू शकते.
प्लॅन-बी सुद्धा
पर्यायी योजनांवर महमूद अहमद यांनी सांगितले की, केवळ व्हर्टिकलच नव्हे तर बारकोटच्या दिशेकडून सुद्धा आडवे खनन होत आहे. तीन स्फोटांद्वारे झालेल्या जागेतून बचाव यंत्रणांनी आठ मीटर आत प्रवेश केला असून, कामगारांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार असला तरी प्लॅन-बी म्हणून तो तयार आहे. सिलकॅरा बाजूने ढिगार्यातून ६-६ मीटर लांबीचे कमीत कमी तीन स्टील पाईप टाकण्याची गरज आहे.
झारखंडमधील सर्वाधिक कामगार
सरकारच्या वतीने सर्व ४१ कामगारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात झारखंडमधील सर्वाधिक १६ कामगारांचा समावेश आहे. याशिवाय ओडिशातील सात, उत्तर प्रदेश सहा, बिहार चार, पश्चिम बंगाल तीन, उत्तराखंड आणि आसाम प्रत्येकी दोन तसेच हिमाचल प्रदेशातील एका कामगाराचा समावेश आहे.
अत्याधुनिक संपर्क यंत्रणा
बोगद्यातील ४१ कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी विविध सरकारी यंत्रणा कामास लागल्या आहेत. त्यांच्या मदतीला अत्याधुनिक संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, एन्डोस्कोपी कॅमेर्याच्या मदतीने सर्व कामगारांना प्रत्यक्ष पाहता आले. याशिवाय बचाव मोहिमेतील यंत्रणांचे सल्लागार म्हणून इंटरनॅशनल टनलिंग एक्सपर्ट घटनास्थळी उपस्थित आहेत. एसडीआरएफ-एनडीआरएफच्या वतीने वायर कनेक्टिव्हिटीसोबत मॉडिफाईड कम्युनिकेशन सिस्टिमही उपलब्ध करण्यात आली आहे.