किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजयपूर, ९ एप्रिल – सचिन पायलट समर्थकांच्या बंडखोरीतून वाचल्यानंतर राजस्थानातील अशोक गहलोत सरकारवर पुन्हा एकदा अस्थिरतेचे ढग निर्माण झाले आहे. कॉंगे्रसच्या आठ आमदारांनी गहलोत सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
माजी मंत्री आणि आमदार भरतसिंह यांनी आपल्याच सरकारमधील खाण मंत्री प्रमोद जैन भाया यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. भरतसिंह यांनी कोटाच्या पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले असून, कॉंग्रेस कार्यकर्ते नरेश मीणा यांच्याविरुद्धची जुनी गुन्हेगारी प्रकरणे उकरून काढली जात असल्याचे म्हटले आहे. हे सर्व मंत्री प्रमोद जैन भाया यांच्या इशार्यावरूनच होत असल्याचे भरतसिंह यांनी पत्रात नमूद केले आहे. नरेश मीणा पक्षाचे साधे कार्यकर्ते आहेत तर मंत्री प्रमोद जैन भाया यांच्याविषयी अख्ख्या राजस्थानला माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी प्रमोद जैन यांचा उल्लेख ‘माफिया’ असा केला होता.
भरतसिंह यांच्या आधी अशोक गलहोत सरकारविरुद्ध कॉंग्रेसच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा उगारला होता. सभागृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यक समुदायाच्या आमदारांविषयी भेदभाव करण्यात येतो व त्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप केला होता. त्याच्याही पूर्वी माजी मंत्री रमेश मीणा, आमदार वेदप्रकाश सोळंकी आणि मुरारीलाल मीणा यांनीही सरकारच्या कामकाजाविषयी जाहीरपणे असंतोष व्यक्त केला होता. याशिवाय माजी मंत्री विश्वेंद्रसिंह आणि माजी मंत्री हेमाराम चौधरी यांनीदेखील गहलोत सरकारविरुद्धच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती.