किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – दिवाळीचे दोन दिवस उलटूनही दिल्ली अजूनही आजारी आहे. प्रदूषणामुळे परिस्थिती बिकट आहे. स्विस कंपनी आयक़्युएअर नुसार दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. दरम्यान, दिल्लीतील आणखी एक धक्कादायक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये पूर्वी फक्त हवा खराब होती मात्र आता पाणीही विषारी झाल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे यमुना घाटावर पुन्हा विषारी फेस येऊ लागला आहे. त्यामुळे छठ साजरी करणार्या भाविकांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. छठ सणापूर्वी यमुनेत फेस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी हीच परिस्थिती कायम असून दिल्ली सरकारचे सर्व दावे फोल ठरत आहेत. यंदाही छठपूजेची जोरदार तयारी सुरू आहे. घाट सुशोभित होत असतानाच दुसरीकडे या विषारी फेसामुळे भाविकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केजरीवाल सरकारने यमुना स्वच्छतेसाठी अतिरिक्त बजेटही जारी केले असताना ही परिस्थिती आहे.
वास्तविक, यमुनेच्या पाण्यात डिटर्जंटचे प्रमाण सांडपाणी किंवा उद्योगातील कचर्यातून येते. त्यामुळे नदीत फेस निर्माण झाला आहे. उद्योगातून निर्माण होणारा कचरा कमी असेल, पण तो सांडपाण्यापासून निर्माण होणार्या कचर्यापेक्षा जास्त घातक आहे. ’यमुना जिये’ मोहिमेचे संयोजक मनोज मिश्रा यांनी मार्चमध्ये म्हटले होते की बहुतेक सरकारे केवळ सांडपाणी प्रक्रिया योजना बनविण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर यमुनेच्या पाण्यात औद्योगिक सांडपाणी म्हणजेच द्रव कचरा जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे, यमुनेचे पाणी प्रदूषित होत आहे, फेस तयार होत आहे. मात्र, हरियाणातील कारखान्यांमधून बाहेर पडणार्या पाण्यामुळे यमुनेतील अमोनियाची पातळी वाढत असल्याचा आरोप दिल्ली सरकार सातत्याने करत आहे. आता दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीवर याप्रकरणी हल्लाबोल केला आहे.