किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल– केजरीवाल यांच्या भाषणात व्यत्यय,
नवी दिल्ली, (८ जून) – गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या पूर्व दिल्ली कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असताना उपस्थितांनी मोदी, मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कृतीवर आम आदमी पार्टीने भाजपावर कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा आरोप केला. घोषणा देणार्यांना थांबवताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, अशा घोषणाबाजीतून शिक्षण व्यवस्था सुधारता आली असती, तर ती गेल्या ७० वर्षांत सुधरली गेली असती.
भाषणादरम्यान केजरीवाल दिल्ली सरकारच्या शालेय शिक्षण मॉडेलबद्दल बोलत होते तेव्हा काही श्रोत्यांनी मोदी, मोदींच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी केजरीवाल म्हणाले, मी या पक्षाच्या आणि इतर पक्षांतील लोकांना आवाहन करतो की, कृपया मला पाच मिनिटे बोलू द्यावे. मला माहीत आहे की तुम्हाला कदाचित माझ्या कल्पना आणि विचार आवडणार नाहीत. तुम्ही विचार मांडू शकता पण भाषणात व्यत्यय आणणे योग्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, असे ते श्रोत्यांना शांत करताना म्हणाले. या गदारोळावर आम आदमी पार्टीने आरोप केला की, भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमादरम्यान गोंधळ घातला परंतु केजरीवाल यांनी त्यांना उत्तराद्वारे शांत केले.
उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असताना कॅम्पसबाहेर आप आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. पूर्व दिल्ली परिसरातील गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे उद्घाटन कोण करणार यावरून दिल्लीतील आप सरकार आणि नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातील वादाचा मुद्दा बनला आहे. दोन्ही बाजूंनी दावा केला आहे की ते नव्याने बांधलेल्या कॅम्पसचे उद्घाटन करतील. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर नवीन कॅम्पसचे अवास्तव श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.