किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपलक्कड, ३० मार्च – चांदीच्या काही तुकड्यांसाठी जुडासने येशूचा ज्या प्रमाणे विश्वासघात केला, तसाच विश्वासघात केरळातील सत्ताधारी माकपा सरकार येथील नागरिकांचा करीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे सोने तस्करी प्रकरणावरून एलडीएफवर केला.
निष्पाप भाविकांवर लाठ्या बरसवणार्या डाव्या आघाडीला लाज वाटायला पाहिजे, अशी टीका त्यांनी एलडीएफ सरकारवर शबरीमलै मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत केली.
चांदीच्या काही तुकड्यांसाठी जुडासने प्रभू येशू यांचा विश्वासघात केला होता. तसाच विश्वासघात एलडीएफने केरळातील नागरिकांचा केला, अशी टीका त्यांनी येथील भाजपाचे उमेदवार मेट्रोमॅन ई. श्रीधरन् यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत केली.
सत्ता असताना कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने भ्रष्टाचारातून सूर्याच्या किरणांनाही सोडले नाही, असा सौर पॅनल घोटाळ्याचा उल्लेख करताना त्यांनी यूडीएफ आघाडीवर टीका केली. युवकांच्या वाढत्या आकांक्षांमुळे दक्षिणेतील राजकारण आता बदलणार आहे. येथील युवक एलडीएफ आणि विरोधातील यूडीएफच्या छुप्या आघाडीबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
केरळातील यूडीएफ आणि एलडीएफमधील छुपी आघाडी कित्येक वर्षे गोपनीय राहिली. येथील मतदार प्रथमच या ‘मॅच फिक्सिंग’बद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. शबरीमलैच्या भाविकांवर लाठ्या बरसवणार्या डाव्या सरकारला लाज वाटायला पाहिजे, असा घणाघात त्यांनी राज्य सरकारवर केला. आपली संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणार्या पक्षाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आमच्या संस्कृतीचा अपमान केला, असे मला एलडीएफ आणि यूडीएफला सांगायचे आहे. आम्ही मूकदर्शकाची भूमिका घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.