किमान तापमान : 26.83° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.59°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलबेळगाव, (२ मार्च) – ज्येष्ठ भाजपा नेता तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्नाटकातील बेळगाव येथे पक्षाच्या विजय संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार आदी उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. हा पक्ष दररोज एकेका तरुण नेत्याला समोर आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून स्वत:चेच नुकसान करत आहे.
अशा वक्तव्यांतून त्यांची विचारपातळी रसातळाला गेल्याचे दिसून येते. काँग्रेस जितक्या प्रमाणात चिखलफेक करेल, तितक्याच मोठ्या प्रमाणात कमळ उमलून येईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या कामांचे कौतुक केले. येदियुरप्पांनी प्रकृती कारणांमुळे मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. त्यानंतर बसवराज बोम्मई मागील दीड वर्षांपासून सरकार चालवित आहेत. येदियुरप्पा अनेक दशकांपासून भाजपा आणि राज्याची सेवा करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या शस्त्रनिर्मितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मागील दिवसांत एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या दोन कंपन्यांना ४७० विमानांची ऑर्डर दिली असून, हा संरक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठा व्यवहार आहे. कर्नाटकातील हवाई वाहतूक क्षेत्रात सकि‘य असलेल्या आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना त्याचा लाभ होणार आहे.