किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२१ मे) – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जोपर्यंत कलम ३७० पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याचेही म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती बेंगळुरूमध्ये म्हणाल्या, चीन आता जम्मू-काश्मीरच्या बाबतीत हस्तक्षेप करत आहे, तर आधी फक्त पाकिस्तानच असे करत असे. भाजपने कलम-३७० रद्द केल्याचा हा परिणाम आहे.’’ कलम-३७० पूर्ववत होईपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण माझा पक्ष निवडणूक लढवेल, असेही त्या म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर हे खुले जेल असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, आपल्या सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाबाबत असे घडू शकते, तर ते कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. मेहबुबा म्हणाल्या, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण होते, परंतु कलम-३७० रद्द करून राज्याचे विभाजन करून त्यांना अपंग बनवले गेले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने अनेक विरोधी पक्षांना शपथविधीसाठी आमंत्रित न केल्याबद्दल मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की काँग्रेसने आणखी त्याग करावा अन्यथा इतर पर्याय आहेत. मेहबुबा पुढे म्हणाल्या, भाजपला विरोध नको आहे. दिल्ली सरकार हतबल झाले आहे. प्रत्येकाचे हेच होणार आहे. ते म्हणाले की जेव्हा सर्वांनी हार मानली तेव्हा कर्नाटकने संपूर्ण देशाला आशेचा किरण दाखवला आहे.