किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोहिमा, (१६ ऑक्टोबर) – पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. मिझोराममध्येही पुढील महिन्यात निवडणुका आहेत. दरम्यान, सोमवारी काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात अनेक बड्या नेत्यांचीही नावे आहेत. किंबहुना, मिझोरामबाबत काँग्रेस हायकमांड अनेक दिवसांपासून सल्लामसलत करत होती. याबाबत दिल्लीत बैठकांच्या अनेक फेर्या झाल्या, त्यानंतर सोमवारी पहिली यादी जाहीर करण्यात आली. याची अनेक दिवसांपासून पक्षाचे नेते व कार्यकर्ते वाट पाहत होते. विधानसभेच्या एकूण ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. येथे ७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, त्याचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
२०१८ च्या मिझोराम निवडणुकीत, मिझो नॅशनल फ्रंटने ४० सदस्यांची विधानसभा जिंकली आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले. एमएनएफ ला २७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने चार जागांवर कब्जा केला, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यातील आठ जागांवर अपक्ष उमेदवारांनी ताकद दाखवली होती.
राहुल गांधी मिझोराम दौर्यावर
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे देखील दोन दिवसांच्या मिझोराम दौर्यावर आहेत. सोमवारी ते आयझॉल येथे पोहोचले आणि तेथे एका जाहीर सभेला संबोधित केले. मणिपूरमधील घटनांचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधीने पाच किमी लांबीची पदयात्रा केली, जी चानमरी येथून सुरू झाली आणि ट्रेझरी स्वायर येथे संपली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.