किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त,
– पंतप्रधानांची गहलोत सरकारवर टीका,
जोधपूर, (०५ ऑक्टोबर) – राजस्थानला देशाच्या विकासाचे इंजिन बनविण्यासाठी भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रातील भाजपा सरकारने बुधवारी उज्ज्वलाच्या लाभार्थी भगिनींना फक्त ६०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सरकारला ‘मेड इन इंडिया’चा खूपच त्रास होत आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशभर गाजत असलेल्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा उल्लेख़ केला आणि कोरोना काळात लस तयार करणार्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे कौतुक केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा बालेकिल्ला असलेल्या जोधपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी गहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, आम्हाला राजस्थानचा विकास करायचा आहे आणि तुमचे स्वप्न पूर्ण करणे हा मोदींचा संकल्प आहे. राजस्थानला पर्यटनात अव्वल करण्याचा भाजपाचा संकल्प आहे. हे काम तुमच्या एका मताने होऊ शकते. तुमच्या एका मताच्या बळावर भाजपाचे सरकार स्थापन होईल आणि राजस्थान पर्यटनात नंबर एक बनेल. पेपर फोडणार्या माफियांनी लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. निवडणुकीच्या वेळी बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन देणार्यांनी संपूर्ण सरकार भ्रष्ट लोकांच्या हाती सोपवल्याची टीका मोदी यांनी केली.
अशोक गहलोत यांच्यावर हल्ला करताना मोदी म्हणाले की, जोधपूर दंगलीच्या आगीत जळत असताना मुख्यमंत्री काय करीत होते? लोक मारले जात असताना इथले नेते काय करत होते? तुष्टीकरण हे काँग्रेसचे अंतिम धोरण आहे का? प्रत्येक सणाला दगडफेकीच्या घटना घडतात. शांतताप्रिय जोधपूरमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे, आमदार सुरक्षित नाहीत आणि एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकार केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.