किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलराजकोट, (२६ फेब्रुवारी ) – गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात आज, २६ फेब्रुवारी दुपारी ३.२१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजकोटपासून वायव्येकडे २७० किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आजकाल भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. यादरम्यान भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी मोजण्यात आली. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. २२ फेब्रुवारीलाच उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी दीड वाजता हा भूकंप झाला. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या जुमला येथे १० किमी भूगर्भात होते, पिथौरागढपासून १४३ किमी. याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी मोजली गेली.