किमान तापमान : 26.83° से.
कमाल तापमान : 26.94° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.94° से.
23.91°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलश्रीनगर, (१३ फेब्रुवारी ) – सर्वोच्च न्यायालयाने गघ मधील विधानसभा जागांच्या सीमांकनाला आव्हान देणार्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. न्यायमूर्ती अभय एस ओक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ज्यामध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या सीमांकन प्रक्रियेला न्याय दिला आहे. श्रीनगरचे रहिवासी हाजी अब्दुल गनी खान आणि मोहम्मद अयुब मट्टू यांच्या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की, सीमांकनामध्ये योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही. तर केंद्र सरकार, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि निवडणूक आयोगाने हा युक्तिवाद चुकीचा असल्याचे म्हटले होते.
१३ मे २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली होती, त्यानंतर कोर्टाने स्पष्ट केले होते की, सुनावणी केवळ सीमांकनावर होईल, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याशी संबंधित मुद्द्यावर विचार केला जाणार नाही. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय एस. ओका यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा जागांच्या सीमांकनासाठी आयोगाची रचना घटनात्मक तरतुदींनुसार योग्य नाही.
परिसीमनात विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत बदल करण्यात आला आहे. त्यात नवीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील २४ जागांसह जागांची संख्या १०७ वरून ११४ करण्यात आली आहे. केंद्र सरकारला निवडणूक आयोगाच्या संमतीने परिसीमन आयोग स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा योग्य वापर केला आहे.