|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » राजस्थान, राज्य » जयपुरात १४०० कोटींचा बेनामी व्यवहार उघडकीस

जयपुरात १४०० कोटींचा बेनामी व्यवहार उघडकीस

आजवरची सर्वांत मोठी आयकर कारवाई,
जयपूर, २३ जानेवारी – आयकर विभागाने सराफा आणि दोन स्थावर मालमत्ता व्यावसायिकांवर छापेमारी करून १४०० कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार उघडकीस आणला आहे. आयकर विभागाची ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज शनिवारी दिली.
या दोन्ही व्यावसायिकांच्या ३१ पैकी २१ ठिकाणांवर आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली. एका स्थावर मालमत्ता व्यावसायिकाने मागील सहा ते सात वर्षांपासून केलेल्या बेनामी व्यवहारांचे तपशील व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात दडवून ठेवले होते, अशी माहिती सीबीडीटीने दिली.
या छापेमारीवेळी कित्येक गुन्हेगारी स्वरूपाचे दस्तावेज आणि डिजिटल डाटा बेहिशेबी पावत्या, बेनामी विकास खर्च, बेनामी संपत्ती, रोख कर्ज व अग्रीम, रोख स्वीकारल्याच्या पावत्यांच्या स्वरूपात आढळला. या समूहाने केलेल्या ६५० कोटींच्या बेनामी व्यवहारांची माहिती आतापर्यंत उघड करण्यात आली, असे सीबीडीटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
व्यावसायिक केंद्र, फार्म हाऊस, टाऊनशिप आणि निवासी बंगले बांधणार्‍या एका स्थावर मालमत्ता कंपनीवरही छापेमारी करण्यात आली. एअरपोर्ट प्लाझा येथील एका प्रकल्पात या कंपनीने केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची नोंद खातेवहीत केली आहे, तर ताळेबंदात १३३ कोटी रुपये दिसून आले. या कंपनीने १९ कोटी रुपयांचे बेहिशेबी कर्ज दिल्याचे आढळले. या कंपनीचा २२५ कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार उघडकीस आला.
सराफा व्यावसायिकाकडे भुयार
जयपूर येथे एका सराफा व्यावसायिकाकडे एक भुयार सापडले आहे. यात तब्बल ७०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे आढळून आले आहे. आयकर विभागाची ही कारवाई पाच दिवस चालली. यामध्ये ५० पथके आणि २०० कर्मचार्‍यांचा समावेश होता. सलग पाच दिवस आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची छाननी करण्यात गुंतले होते.

Posted by : | on : 23 Jan 2021
Filed under : राजस्थान, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g