किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोल्लम, (२५ सप्टेंबर) – केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्लम जिल्ह्यातील चेन्नापारा भागात दोन अज्ञात लोकांनी लष्कराच्या जवानाला बेदम मारहाण केली आहे.इतकंच नाही तर जवानाला मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर झऋख लिहिण्यात आलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा शिपाई राजस्थानमध्ये तैनात असून, शाइन असे या जवानाचे नाव आहे. शाईन हा कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी असून तो रजेवर आपल्या गावी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शाइन आपल्या घरी परतत असताना एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि म्हणाला की, त्याच्या घरापासून काही अंतरावर एक व्यक्ती दारूच्या नशेत पडून आहे. शाइन घटनास्थळी पोहोचल्यावर तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका व्यक्तीने जवानाच्या डोक्यावर मागून जोरदार वार केले. यानंतर जवानाचे हात-पाय टेपच्या साहाय्याने बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर जवान शाइनच्या पाठीवर हिरव्या रंगात पीएफआय लिहिले होते. ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
काही वेळाने जेव्हा जवान शुद्धीवर आला तेव्हा त्याने कसातरी टेप काढून आपल्या एका नातेवाईकाला बोलावले, त्यानंतर जवानाला रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून, या शिपायावर कोणी हल्ला केला आणि त्याच्या पाठीवर झऋख लिहिलंय याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली होती, त्यानंतर पीएफआयचे जाळे तोडण्यासाठी देशभरात एनआयएची कारवाई सुरू झाली. आजही केरळमध्ये १३ ठिकाणी पीएफआय समर्थकांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.