किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– बेकायदेशीर सावकारी प्रकरण,
चेन्नई, (१३ जून) – तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेन्थिल बालाजी आणि इतर काही जणांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने मंगळवारी छापेमारी केली. ही कारवाई बेकायदेशीर सावकारी प्रकरणाच्या तपासांतर्गत करण्यात आली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
माझ्या परिसरात ईडीचे अधिकारी नेमके काय शोधत होते, याबाबत मला माहिती नाही. तपासात त्यांना संपूर्ण सहकार्य केले असल्याचे बालाजी यांनी सांगितले. बालाजी यांच्या चेन्नई आणि मूळ गाव करूर येथे ईडीच्या अधिकार्यांनी छापेमारी केली. अबकारी आणि प्रतिबंधात्मक विभाग असलेल्या बालाजी यांच्याविरुद्ध नोकरीसाठी कथित रोख घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात परवानगी दिली होती. ही छापेमारी बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील महिन्यात आयकर विभागाने बालाजी यांच्या राज्यातील निकटवर्तीयांवर छापेमारी केली होती. ईडीच्या छापेमारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बालाजी म्हणाले की, तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. ते कोणत्या उद्देशाने आले, ते काय शोधत आहेत, ते आपण पाहू. असे बालाजी यांनी छापेमारी सुरू होताच पत्रकारांना सांगितले.