किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलसंतिरबाजार/खोवई, (६ फेब्रुवारी ) – टिपरा मोथाचा काँग्रेस आणि माकपसोबत गोपनीय करार झाला असून, हा नवीन पक्ष या प्रदेशातील मूळ लोकांची दिशाभूल करून त्रिपुरात साम्यवाद्यांना सत्तेत आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोमवारी केला. 2021 मधील त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर माजी राजेशाही वंशज प्रद्योत माणिक्य देववर्मा यांच्या नेतृत्वाखालील टिपरा मोथा पक्षाने 16 फेब्रुवारी रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रेटर टिप्रालॅण्ड राज्याच्या मागणीला पाठिंबा देणार्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याची शक्यता या पक्षाने नाकारलेली नाही.
त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 60 जागांपैकी 42 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय टिपरा मोथा पक्षाने घेतला आहे. येथे सुमारे 20 आदिवासीबहुल जागा आहेत आणि त्यांच्याकडे त्रिपुरातील सत्तेची किल्ली आहे.
टिपरा मोथा पक्षाला मतदान करणे म्हणजे माकपला पाठिंबा देणे आणि काँग्रेसला पाठिंबा देणे म्हणजे साम्यवाद्यांना मतदान करणे आहे. साम्यवाद्यांना जनादेश देणे म्हणजे अशांततेचे दिवस परत आणणे आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तुम्ही साम्यवादी आणि काँग्रेसची कामगिरी पाहिली आहे. त्यांनी त्रिपुरावर 50 वर्षे सत्ता गाजवली, पण विकास केला नाही, आदिवासींचा आदर केला नाही, त्यांच्या कल्याणाबाबत विचार केला नाही. टिपरा मोथा मूलनिवासींची दिशाभूल करून साम्यवाद्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असे अमित शाह यांनी संतिरबाजार येथील सभेला संबोधित करताना सांगितले.
भाजपा सरकारने मागील पाच वर्षांत त्रिपुराची सुरक्षा सुनिश्चित केली. पूर्वी सीमापार घुसखोरी आणि बंडखोरी या राज्याने पाहिली आहे. काँग्रेसने तुम्हाला अंधकार दिला. डावे आणि काँग्रेस भ्रष्टाचार करायचे आणि हे दोघेही आता सोबत आहेत. मात्र, भाजपाच्या विरोधात कुणीही भ‘ष्टाचाराचा आरोप करू शकत नाही.