किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल– सर्वच पक्षांना हवे सत्तेत स्थान,
कोहिमा, (६ मार्च) – विधानसभा निवडणुकीचे त्रिशंकू निकाल लागलेल्या नागालॅण्डमध्ये आता असे सरकार सत्तेत येऊ घातले आहे, जिथे कोणीही विरोधी पक्षात राहणार नाही. कारण, बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकणार्या एनडीपीपी-भाजपा युतीला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. अर्थात्, नागालॅण्डमध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. ६० सदस्यीय नागालॅण्ड विधानसभेत एनडीपीपी-भाजपा युतीने अनुक्रमे २५ आणि १२ जागा जिंकल्या आहेत. अर्थात् या युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सात, एनपीपीने पाच, लोकजनशक्ती पार्टी, नागा पीपल्स पार्टी आणि रिपाइंने प्रत्येकी दोन, जदयूने एक आणि अपक्षांनी चार जागा जिंकल्या.
एनडीपीपी-भाजपा युतीने अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नसला तरी, राज्यातील उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना सत्तेच्या दुसर्या कारकीर्दीसाठी आपला विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. लोजपा, रिपाइं आणि जदयूने आधीच सरकार पाठिंबा देण्याचे पत्र राज्यपालांना सादर केले आहे. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकारला पाठिंबा देणारे पत्र सादर केले. ते पाहता उर्वरित राजकीय पक्षांनीही सरकारला विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २०१५ आणि २०२१ मध्येही अशाच प्रकारचे सरकार या राज्यात सत्तेत आले होते. कारण, त्यावेळी राज्यात विरोधक नावालाही नव्हते. यावेळी मात्र विरोधक असतानाही त्यांनी सरकारला पाठिंबा दिला असल्याने, असे सरकार प्रथमच सत्तेत येत आहे.