किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, (२१ जानेवारी) – अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास उरले आहेत. हा अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण देश राममय झाला आहे. अपूर्व उत्साहात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध देशातून निमंत्रक अयोध्येत दाखल झाले आहेत.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सेमोर अध्योध्येत दाखल झाले आहेत. ते म्हणाले, जय श्री राम. मी पंतप्रधान मोदींसह भारतातील सर्व जनतेचे त्यांच्या नेतृत्वासाठी अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी ५०० वर्षांनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नरेंद्र मोदी यांचे सोमवार सकाळी १०.५५ वाजता श्री रामजन्मभूमी येथे आगमन होईल. १२.०५ ते १२-५५ या वेळेत अभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. दुपारी १ वाजता सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेल. दुपारी २:१० वाजता कुबेर टिळ्याला भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, २२ जानेवारी हा ऐतिहासिक क्षण आहे. माझ्यासारखे सर्व रामभक्त, कारसेवक आणि आंदोलक उद्याच्या तारखेची प्रतीक्षा करीत आहेत. २२ जानेवारीचा उत्सव भव्य आणि दिव्य आहे. येथील तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था पूर्ण केली आहे.