किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-२०१३ मधील पाटणा बॉम्बस्फोट प्रकरण, ६ जणांचा मृत्यू,
पाटणा, (२१ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मेहरे याला मुझफ्फरपूर दरभंगाच्या एसटीएफने संयुक्त कारवाईत अटक केली आहे. एनआयएच्या ताब्यातून पळालेल्या कुख्यात मेहरे आलमचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. २०१३ मध्ये मेहरे आणि त्यांच्या साथीदारांनी पाटणा गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून दहशत माजवली होती.
रिपोर्टनुसार, आरोपी मेहरे आलम याला शनिवारी रात्री दरभंगाच्या अशोक पेपर मिल पोलीस स्टेशन हद्दीतील सिंगौली गावातून एसटीएफने अटक केली. यापूर्वी एनआयएने त्याला पकडले होते, मात्र हॉटेलमधील एजन्सीला चकमा देऊन तो फरार झाला होता. फरार झाल्यानंतर पोलिसांची झोप उडाली होती. फरार आरोपीचे वडील महमूद आलम यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास दरभंगा आणि मुझफ्फरपूर पोलिसांनी येऊन त्याला अटक केली आणि आपल्यासोबत नेले. यापूर्वी एनआयएने त्यांना गांधी मैदान बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करून त्यांच्या भूमिकेची चौकशी केली होती. चौकशीनंतर एनआयए त्याला साक्षीदार म्हणून सोबत घेऊन जात होती. त्याच्या मागावर, इतर संशयितांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत होते. दरम्यान, तो चकमा देऊन फरार झाला.
२७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींची रॅली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या दिवशी गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे झालेल्या अनेक बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर ८२ जखमी झाले होते. त्याचा एफआयआर क्रमांक ६१२/१३ ३० ऑक्टोबर २०१३ रोजी नोंदवण्यात आला होता, मेहरे आलमला एनआयएने बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी बनवले होते.