किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– भाजपा खासदार लॉकेट चटर्जी यांना अश्रू अनावर,
नवी दिल्ली, (२१ जुलै) – मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्याच्या घटनेचा तीव्र निषेध करीत, पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी पश्चिम बंगालमध्येही अशीच घटना घडल्याचा आरोप केला. भाजपा खासदार लॉकेट चटर्जी यांनी आज भाजपा मुख्यालयात सुकांत मुजुमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत मणिपूरमध्ये घडली तशीच घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्याचा आरोप केला. मात्र, दोन घटनातील फरक म्हणजे मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ उपलब्ध आहे, तर पश्चिम बंगालमधील घटनेचा व्हिडीओ आमच्याजवळ नाही, असे त्या म्हणाल्या. राज्यातील या घटनेची माहिती देताना लॉकेट चटर्जी यांना अश्रू आवरले नाही.
मणिपूरमध्ये जी घटना घडली, ती खूपच दु:खद आहे, आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. अशा घटना कुठेच होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण पांचाल पंचायत निवडणुकीत उभी राहिली म्हणून एका भाजपा कार्यकर्तीलाही विवस्त्र करुन गावात फिरवण्यात आले. बंगालची ही घटना मणिपूरमधील घटनेपेक्षा कमी दु:खद आहे का, हे बोलत असताना चटर्जी यांच्या डोळ्यात पाणी आले.
विशेष म्हणजे, बंगालमध्ये एकाच दिवशी अशा दोन घटना घडल्या. पहिली घटना उत्तर बंगालच्या अलिपूरद्वार येथे तर, दुसरी घटना दक्षिण बंगालच्या वीरभूम येथे घडली, असा आरोप करत मुजुमदार म्हणाले की, दोन्ही घटनांत महिलांना विवस्त्र करून गावात फिरवण्यात आले. एका घटनेत तर विवस्त्र करून महिलेला गाढवावर फिरवण्यात आले. या घटनेमागे राजकीय कारण नाही तर, अन्य कारण आहे. मात्र, महिलांच्या सन्मानाबाबत पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार सुरू आहे, तो चिड आणणारा आहे. या घटनेचा आमच्याजवळ व्हिडीओ नाही; कारण ममता बॅनर्जीचे पोलिस आणि तृणमूलचे गुंड अशा घटनांचा व्हिडीओ काढू देत नाही, असे चॅटर्जी म्हणाल्या.
राज्यात एकामागे एक अशा घटना घडत आहे; मात्र एक महिला असूनसुद्धा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा घटनांवर चूप आहे. त्यामुळे तुम्हीच सांगा आम्ही न्याय मागायला जायचे तरी कुठे, अशी विचारणा करत लॉकेट चटर्जी म्हणाल्या की, आमच्या मुलींना वाचवा, अशी आमची मागणी आहे. मणिपूरच्या मुली जशा देशाच्या मुली आहेत, तसेच पश्चिम बंगालही याच देशात आहे ना.