किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– आयआयटी मद्रासच्या चमूचा सहभाग,
कोलकाता, (२५ मे) – हावडा आणि कोलकाता या जुळ्या शहरांना जोडणार्या हुगळी नदीवरील ८० वर्षे जुन्या हावडा पुलाची ११ वर्षांच्या कालावधीनंतर सखोल तपासणी करण्यात येणार आहे. आयआयटी मद्रासशी सल्लामसलत करून हावडा ब्रिजची सर्वंकष तपासणी केली जाईल, असे कोलकाता बंदराचे अध्यक्ष रथेंद्र रमण यांनी सांगितले. आम्ही हावडा पुलाच्या देखभालीचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आहे. सुमारे एका दशकाहून अधिक काळापासून या पुलाची तपासणी केली नाही. या अभ्यासामुळे आम्हाला पुलाचे आयुष्यमान कसे सुधारता येईल याबद्दल नव्या दृष्टीने विचार करता येईल, असे रमण यांनी बुधवारी सांगितले. या पुलाची सर्वसमावेशक तपासणी ११ वर्षांपूर्वी ‘राईट्स’च्या तज्ज्ञांनी केली होती.
१९४३ मध्ये लोकार्पण झालेल्या या पुलाची लांबी ४०५ मीटर आणि रुंदी २१.६ मीटर असून, कोलकात्याचे प्रतीक असलेल्या पुलाला ‘रवींद्र सेतू’देखील म्हणतात. १९२६ मध्ये सर आर. एन. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने हुगळी नदीवर एक विशिष्ट प्रकारचा लटकता पूल बांधण्याची शिफारस केल्यानंतर तो बांधकामासाठी घेण्यात आला. बंदर प्राधिकरणाने आधीच ८० वर्षे जुन्या संरचनेवरील बिटुमिनस रस्त्याच्या पृष्ठभागावर स्क‘ॅप करण्याचे काम सुरू केले होते आणि आता पुलाचा भार कमी करण्यासाठी नवीन थर घातला जाईल.
नॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर फॉर पोर्ट्स, वॉटरवेज अॅण्ड कोस्ट, आयआयटी मद्रासचा विभाग पुलाच्या सर्वसमावेशक अभ्यासासाठी अधिकार्यांना सल्ला देईल, असे रमण यांनी सांगितले. गरज भासल्यास बंदर अधिकार्यांना या उपक‘मात मदत करण्यासाठी आणखी एका तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. हावडा ब्रिजवरून दररोज अंदाजे ८०,००० वाहने आणि ४ लाख पादचारी आवागमन करतात. पुलाचे महत्त्व ओळखून कोलकाता बंदर, ज्याला आता श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर म्हणून ओळखले जाते, त्याचे भविष्य सुरक्षित करणे आणि तांत्रिक दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट आहे.अभ्यासाची व्याप्ती अद्याप निश्चित केली गेली नाही. परंतु, पूल जीर्ण होणे आणि अन्य समस्यांचे बारकाईने परीक्षण तज्ज्ञ करतील.