किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– २३.४४ लाख मूल्याच्या नोटा जप्त,
राजकोट, (२५ मे) – गुजरातच्या राजकोट शहरात बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून त्यांच्या ताब्यातून २३.४४ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून एकूण ४९५७ बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सर्वप्रथम विशाल गढिया याच्या दुकानातून ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी त्याला आणि विशाल बुद्धदेव याला ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता गढियाने सांगितले की, त्याला निकुंज भालोदिया नावाच्या एका व्यक्तीने नोटा दिल्या होत्या, असे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले. पोलिसांनी भालोदियाच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडून ५०० आणि १०० रुपयांचे एफआयसीएन आणि नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणार्या प्रिंटर-स्कॅनर आणि संगणक प्रणालीसह विविध साहित्य जप्त केले. भालोदिया कलर प्रिंटरद्वारे प्रिंट काढण्यापूर्वी नोटा स्कॅन करायचा आणि फोटोशॉपमध्ये जेपीजी फाईल्स संपादित करायचा. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.