किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मुंबई-अहमदाबाद अंतर कमी होणार,
वलसाड, (०६ ऑक्टोबर) – गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील झारोली गावाजवळ मुंबई व अहमदाबाद दरम्यानच्या देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील ३५० मीटर लांबीचा डोंगराळ बोगदा पूर्ण झाला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनआचएसआरसीएल) हा कॉरिडॉर बांधत आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील खडकाचा शेवटचा थर काढून टाकण्यासाठी अंतिम स्फोट करून एनएचएसआरसीएलने हा क्षण साजरा केला. हा बोगदा गुजरातमधील वलसाडच्या उंबरगाव तालुक्यातील झारोली गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने (एनएटीएम) १० महिन्यांत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले, असे पत्रकात म्हटले आहे.
बोगद्याचे संरेखन पूर्णपणे सरळ कसे ठेवायचे हे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान होते. कारण, बुलेट ट्रेन ३५० कि. मी. प्रतितास वेगाने धावेल, तेव्हा संरेखनातील किरकोळ त्रुटीसुद्धा वाईट करू शकते. त्यामुळे प्रत्येक तपशील तंतोतंत पाळला जाणे आवश्यक आहे. एक मिलिमीटरचीही त्रुटी सापडत नाही, असे वलसाड विभागाचे मु‘य प्रकल्प व्यवस्थापक एस. पी. मित्तल यांनी सांगितले. बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग लागला. त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली बांधण्यात आलेला हा पहिला डोंगरी बोगदा असल्याने खूप समाधान वाटते. मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या ५०८ किलोमीटरच्या मार्गावर एकूण सात बोगदे बनवण्याचे प्रस्तावित असून, दुसर्या बोगद्याचे काम लवकरच सुरू होईल, असे मित्तल म्हणाले. भारतातील पहिला बोगदा आहे, ज्यातून ३५० कि. मी. प्रतितास वेग असलेली ट्रेन जाणार आहे. संपूर्ण बांधकाम कालावधीत आमच्या चमूला एकाही अप्रिय घटनेचा सामना करावा लागला नाही, असे ते म्हणाले.