किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल३५ जणांना अटक,
बोलंगीर, (१४ मार्च) – ओडिशाच्या बोलंगीर पोलिसांनी त्यांच्या ’मिशन कफ सिरप’ मोहिमेअंतर्गत सर्वात मोठ्या ’कफ सिरप रॅकेट’चा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील ३५ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून ३५ लाख रुपयांच्या ’अस्कुफ’ कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना नेगी आणि प्रशांत खेती हे रॅकेटचे दोन प्रमुख आरोपी आहेत. बोलंगीर पोलिसांनी सांगितले की, ’मिशन कफ सिरप’ अंतर्गत त्यांनी रविवारी एका आंतरराज्य संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला. बोलंगीर पोलिसांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे बोलले जात आहे.
बलांगीरचे एसपी नितीन कुशाळकर म्हणाले की, स्थानिक आणि तांत्रिक गुप्तचर माहिती आणि तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, अस्कुफ सिरपची अवैध खरेदी, वाहतूक आणि विक्री यातील रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक वाहन, दोन पिकअप व्हॅन, एक वाहन, दोन मोटारसायकली, ७,५०० रुपये रोख, १७ मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
एसपी म्हणाले की, पुरवठादार कंपनी, मेसर्स डॅफोडिल ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड, कोलकाता यांच्या मालकीची २ कोटी रुपयांची रक्कम देखील गोठवण्यात आली आहे. नितीन कुशाळकर यांनी सांगितले की, कफ सिरप माफियांची मोडस ऑपरेंडी रात्रीच्या वेळी विशेषतः पहाटे ३, ४ आणि पहाटे ५ वाजता गोळा करणे आणि वितरित करणे आहे. अंधारात काम करत असल्याने रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस काम करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत खेती याला अटक करण्यात आली असून, सना नेगीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.