किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (११ जून) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तामिळनाडूच्या दौर्यावर आहेत.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमधून २० जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी ठेवले आहे. भविष्यात एका तामिळ व्यक्तीला पंतप्रधान बनवणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतून २० पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी आणि बूथ समित्या बळकट करण्यासाठी भाजप पदाधिकार्यांना काम करण्याचे आवाहनही शहा यांनी केले. यापूर्वी दोनदा अशी संधी हुकली आहे. शहा यांनी यासाठी सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)ला जबाबदार धरल्याचेही बोलले जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी वेल्लोर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, डीएमके-युपीए १० वर्षे सरकारमध्ये राहिले, याआधी ८ वर्षे सत्तेतही राहिले पण तामिळनाडूच्या मुलांना सीएपीएफ, एनईईटी आणि इतर परीक्षांमध्ये तामिळ भाषेत पेपर लिहू दिले गेले नाहीत. आता अखिल भारतीय सेवा, सीएपीएफ, एनईईटी च्या परीक्षाही तमिळ भाषेत घेतल्या जातात.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जगात भारताचा सन्मान वाढवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. नुकतेच नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले आणि संसद भवनात तामिळनाडूच्या चोल साम्राज्याचे सेंगोल स्थापन केले.