किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.63° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 27.86°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादलराज्यपाल जगदीप धनकड यांची टीका, हिंसाचारग्रस्त भागाचा करणार दौरा,
कोलकाता, १० मे – ममता बॅनर्जी सरकारमधील आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी आज सोमवार तृणमूल सरकारवर टीकास्त्र सोडले. मतदानाचा अधिकार बजावण्याची किंमत येथील नागरिक मोजत आहेत, असे सांगताना, विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचार झालेल्या भागाचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचारामुळे उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. मी हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. माझे संवैधानिक कर्तव्य म्हणून मी राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांना भेट देणार आहे आणि या दौर्याची व्यवस्था करण्यात यावी, असे राज्य सरकारला सांगितले. दुर्दैवाने राज्य सरकारने फारसा प्रतिसाद दिलेला नाही. निर्धारित कार्यक्रमाप्रमाणेच मी दौर्यावर जाईल किंवा येत्या काही दिवसांत मी स्वतःच या दौर्याची व्यवस्था करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्य संकटात सापडले आहे. सतत होणारा हिंसाचार, जाळपोळ, लूट करणे, धमकावणे, खंडण्या ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणतीही जबाबदारी न घेणार्या सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा त्यांनी यावेळी निषेध केला.
लोकशाही मूल्यांना कलंकित करणार्या दोषींची ओळख पटवून त्यांना शिक्षा ठोठावत राज्य सरकारने विश्वासार्हता जपावी, अशी टीका त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर केली. तुम्ही दिलेल्या मतामुळे तुमचा मृत्यू होत असेल किंवा संपत्तीचे नुकसान होत असेल, तर हे लोकशाही संपुष्टात येत असल्याचे संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले.