किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-पाकी प्रेम ऊतू चालल्याची टीका,
भोपाळ, (१८ सप्टेंबर) – काँग्रेसने मध्यप्रदेशच्या जनआक्रोश यात्रेतील आपल्या प्रचारासंदर्भातील गाण्याची थीम पाकिस्तानातून चोरल्याचा आरोप भाजपाने केला आहे. मध्यप्रदेशात नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असतानाच प्रचार मोहिमेसाठी ‘चलो, चलो… काँग्रेस के संग चलो चलो,’ असे गाणे तयार केले आहे.
यावर भाजपाने संबंधित गाण्याची चाल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे गाणे ‘चलो, चलो इम्रान के साथ,’ यावर आधारित असल्याचा आरोप लावला आहे. या संदर्भात मध्यप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सचिव राहुल कोठारी यांनी एक्सवर काँग्रेसच्या प्रचार मोहिमेतील गाण्यासह पाकिस्तानी गाण्याचा व्हिडीओही शेयर केला आहे. याशिवाय काँग्रेसचे पाकिस्तानी प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. या पक्षाची चोरीची सवय जुनी असली तरी, पाकिस्तानसोबत इतके प्रेम कसे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला आहे.