किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– सरकारच्या विरोधात कट रचल्याचा आरोप,
भोपाळ, (४ फेब्रुवारी ) – सरकारविरोधात कट रचल्याच्या आणि बेकायदेशीर कारवायांत सहभागी असल्याच्या आरोपाखाली मध्यप्रदेश पोलिसांनी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात् पीएफआयच्या पदाधिकार्याला भोपाळ येथे अटक केली. राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाने मागील वर्षी दाखल केलेल्या प्रकरणात शुक‘वारी ही अटक करण्यात आली. वासिद खान असे अटक केलेल्या पीएफआयच्या सदस्याचे नाव आहे. भादंवितील कलम १२१ ए (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट, १५३ बी (राष्ट्रीय एकात्मच्या विरोधात वक्तव्य) आणि १२० बी (गुन्हेगारी कट) या व्यतिरिक्त बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
खान हा पीएफआयसोबत जुळलेला आहे आणि २०१७ पासून या संघटनेच्या विविध कार्यक‘मांना त्याने हजेरी लावली. २०१९ मध्ये तो पीएफआयचा विधिविभाग असलेल्या नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईटस् ऑर्गनायझेशनशी जुळला. तो या संस्थेचा राज्य सरचिटणीस आहे, असे अधिकार्याने सांगितले. अटक केल्यानंतर खानला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
बिहारमध्ये तीन संशयित सदस्य ताब्यात
एनआयए आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने पीएफआयच्या तीन संशयित सदस्यांना चंपारण जिल्ह्यातून आज शनिवारी ताब्यात घेण्यात आले. या सदस्यांना चाकिया उपविभागातून आज सकाळी पकडण्यात आले. आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक जे. एस. गंगवार यांनी दिली.