किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२३ ऑक्टोबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ९२ उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर केली. यात महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील २२८ उमेदवारांची भाजपाने आतापर्यंत घोषणा केली असून, आता फक्त दोन उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
इंदूर तीन विधानसभा मतादरसंघाचे विद्यमान आमदार आकाश विजयवर्गीय यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागेवर राकेश शुक्ला यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपाने आकाश विजयवर्गीय यांचे वडील आणि राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांना उमेदवारी दिली आहे. आकाश विजयवर्गीय यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवत आपल्याला उमेदवारी देऊ नये, अशी विनंती केली होती, असा खुलासा यावर कैलास विजयवर्गीय यांनी केला. इंदूरमध्ये महानगर पालिकेचे अधिकारी एक अतिक‘मण पाडण्यासाठी गेले असता आकाश विजयवर्गीय यांनी त्यातील एका अधिकार्याची पिटाई केली होती. त्यामुळे ते वादग‘स्त ठरले होते.
ज्योतिरादित्य शिंदे समर्थक मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांना गुणा जिल्ह्याच्या बमौरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ओपीएस भदोरिया आणि गौरीशंकर बिसेन या दोन मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. बिसेन यांच्या जागेवर त्यांची मुलगी मौसमी बिसेन यांना बालाघाट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळातील एक मंत्री यशोधराराजे शिंदे यांनीच स्वत:च निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल, अशी अपेक्षा होती, पण या यादीत शिंदे यांचे नाव नसल्यामुळे त्यांची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी झाली आहे. मनगंवा मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदार पंचुलाल प्रजापती यांचे तिकीट नरेंद्र प्रजापती यांना उमेदवारी दिली.