किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलभोपाळ, (१४ डिसेंबर) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी जाणार्या रामभक्तांचे प्रवासादरम्यान स्वागत करणार असल्याचे मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले आहे.
राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी मध्यप्रदेशातून अयोध्येला जाणार्या भाविकांचे राज्य सरकार स्वागत करणार आहे. पहिली बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, राम मंदिराच्या अभिषेकप्रसंगी मध्यप्रदेशातील अनेक भाविक अयोध्येला जाणार आहेत आणि त्यांच्या कपाळावर ‘तिलक’ लावून त्यांचे स्वागत केले जाईल.
डॉ. यादव यांनी राम मंदिर आंदोलनादरम्यान कारसेवकांना आलेल्या कठीण प्रसंगांची आठवण करून दिली. अयोध्येत भव्य राम मंदिर पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत असताना त्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. एका अधिकार्याने सांगितले की, अयोध्येला जाणार्या भाविकांसाठी अन्न, पाणी आणि इतर आवश्यक सुविधांसह सर्व शक्य व्यवस्था केल्या जातील.
लोकांना कोणतीही अडचण न येता अयोध्येला जाता यावे यासाठी उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात ही व्यवस्था केली जाईल. गरज भासल्यास भाविकांना अयोध्येला नेण्यासाठी तीर्थ दर्शन योजनेच्या धर्तीवर विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाईल, असे अधिकार्याने सांगितले. तीर्थ दर्शन योजनेंतर्गत, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्रांना मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जाते.