किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल– संतांची शिकवण सावरते : शिवराजसिंह चौहान,
उज्जैन, (०७ ऑक्टोबर) – राजकारणाचा मार्ग नेहमी निसरडा असतो, त्यावरून वारंवार घसरण्याची शक्यता असते. मात्र, संतांची शिकवण आम्हाला त्यापासून सावरते, असे उद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढले. महाकाल कॉरिडोरच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण, मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन आणि अन्य काही विकास कामांसंदर्भात मोठा कार्यक्रम झाला. त्यावेळी शिवराजसिंह चौहान बोलत होते.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका व्यक्तीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता संघटनेच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाने तीन केंद्रीय मंत्री आणि सात विद्यमान खासदार यांना मध्यप्रदेश विधानसभेचे तिकीट देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पृष्ठभूमीवर शिवराजसिंह यांचे हे उद्गार महत्त्वाचे मानले जात आहे. राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा असतो. त्यावरून आपण घसरण्याची शक्यता असते, पण संतांची शिकवण आम्हाला सावरते. हिंदुत्व अद्भुत आहे.
भारताबरोबरच संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविण्याचे सामर्थ्य आमच्या सनातन धर्मात आहे. संत समाजाने नेहमीच संपूर्ण समाजाचे मार्गदर्शन केले आहे. राजकारणाच्या निसरड्या मार्गावरून चालण्याचे आणि सावरण्याचे सामर्थ्य संत समाजाने आम्हाला द्यावे, असे आवाहन शिवराजसिंह यांनी केले. आज सनातन धर्म संपविण्याची भाषा केली जाते पण सनातन धर्माला कोणी संपवू शकत नाही. कारण सनातन धर्म आदि आणि अनंत आहे. धर्माला संपविण्याची भाषा करणारे संपतील, पण सनातन धर्म कधीही संपणार नाही, असा आत्मविश्वासही शिवराजसिंह यांनी व्यक्त केला.