किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभोपाळ, (१३ सप्टेंबर) – आपण राजकारण सोडलेले नाही. पुढील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केली. आपण दीर्घकाळ काम केले असल्याने केवळ पाच वर्षांचा ब्रेक घेतला होता, असे उमा भारती यांनी बुंदेलखंड भागातील सागर जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना सांगितले.
मी दीर्घकाळ काम केले असल्याने मागच्या वेळी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला होता. पाच वर्षे ब्रेक घेण्याचा विचार मी त्यावेळी केला होता. मात्र, त्यामुळे मी राजकारण सोडल्याची धारणा लोकांमध्ये झाली. परंतु, मी राजकारण सोडले नसल्याचे सांगून आता थकली असल्याचे उमा भारती म्हणाल्या. केन-बेटवा नदी जोडणी प्रकल्प, ललितपूर-सिंग‘ौली रेल्वे लाईन यासह अनेक विकास कामांचा संदर्भ देताना उमा भारती म्हणाल्या, मी राजकारणात असतानाच हे प्रकल्प वास्तवात आले. मी ७५ वर्षांची अथवा ८५ वर्षांची झाले तरी, राजकारणात सकि‘य राहील आणि पुढील निवडणूक लढवेल. मला राजकारण आवडते.
राजकारण हे ऐशोआरामाचा स्रोत असल्याची धारणा असलेल्यांमुळे राजकारण उद्ध्वस्त झाले आहे, असे उमा भारती यांनी म्हटले. मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असून, लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. उमा भारती यांनी २०१४ मध्ये उत्तरप्रदेशातील झाशी येथून शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात विजय मिळवल्यानंतर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्या होत्या.