किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– मध्य प्रदेशच्या भिंड शहरातील घटना,
भोपाळ, (२५ फेब्रुवारी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाच्या परिसरात हॅण्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड शहरातील राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या कार्यालयाच्या प्रांगणात, भगवा ध्वज लावण्याच्या जागेवर हॅण्ड ग्रेनेड सापडले. घटनास्थळी बॉम्बरोधक पथक दाखल झाले असून, मध्य प्रदेश पोलिसांनी व्यापक शोधमोहिम राबवित तपास सुरू केला आहे. संघ कार्यालयाच्या परिसरात खेळणार्या मुलांना, चेंडूसारखी वस्तू सापडली. तेव्हा संघ कार्यालयात कोणी उपस्थित नसल्याने मुलांनी घरी त्याविषयी सांगितल्यानंतर, रात्री उशिरा पोलिसांना या हॅण्ड ग्रेनेडविषयी माहिती मिळाली.
हॅण्ड ग्रेनेडविषयी माहिती मिळताच, पोलिसांनी फायरींग रेंज स्थित करून, बॉम्बरोधक पथकाला पाचारण केले. स्निफर कुत्र्यांच्या पथकानेही तपासणी केली. बॉम्बरोधक पथकाच्या तपासणीत, तो हॅण्ड ग्रेनेड ३० ते ३५ वर्षे जुना आणि निष्क्रीय असल्याचे आढळून आले. हे वृत्त कळताच लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ कार्यालयाच्या प्रांगणात मातीची भर घालण्यात आली होती. हा ग्रेनेड कदाचित त्या मातीसोबतच तिथे आला असण्याची शक्यता आहे.