किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 24.03° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल– धीरेंद्र शास्त्री यांनी वेदांसमोर घेतली प्रतिज्ञा,
छत्तरपूर, (१५ फेब्रुवारी ) – बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी चारही वेदांसमोर भारताला हिंदू राष्ट्र करण्याची प्रतिज्ञा घेतली. मध्यप्रदेशच्या छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथे हिंदू राष्ट्रासाठी सोमवारपासून एका महायज्ञाला सुरुवात झाली आहे. हा महायज्ञ सात दिवस चालणार आहे. या महायज्ञाच्या शुभारंभप्रसंगी धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकल्प घेतला आणि हिंदू राष्ट्रचा जयघोषही केला.
या महायज्ञाच्या निमित्ताने का होईना, बागेश्वर धाम येथे हिंदुत्वाचे सर्वांत मोठे शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. लाखोंच्या संख्येने भाविक या यज्ञात व त्यानिमित्त आयोजित प्रवचन तसेच विविध कार्यक‘मांत सहभागी होत आहेत. सात दिवस म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत छतरपूरच्या गढा गावात संत-महंतांचा मेळावाच जणू भरणार आहे. दरम्यान, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही या यज्ञस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. विद्यमान मु‘यमंत्री शिवराजसिंह चौहान १८ फेब्रुवारीला बागेश्वर धाम येथे महायज्ञाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले तसेच येणार असलेले संत बाबा बागेश्वरच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले दिसणार आहेत. याच व्यासपीठावरून हिंदू राष्ट्राचा संकल्प केला जाणार आहे. या महायज्ञाच्या काळातच १८ फेब्रुवारी रोजी येथे १२१ मुलींचा विवाह करण्याची योजना आहे.