किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– लैंगिक टिप्पणीबद्दल एसआयएएची माफीची मागणी,
चेन्नई, (२० नोव्हेंबर) – तमिळ अभिनेत्री तृषा कृष्णन् हिने ‘लिओ’चा सहकलाकार मन्सूर अली खान याने तिच्याविषयी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे रविवारी साऊथ इंडियन आर्टिस्ट्स असोसिएशनने (एसआयएए) देखील मन्सूर अली खानने तृषाबद्दल केलेल्या लैंगिक टिप्पणीबद्दल टीका करून त्याने तृषाची जाहीर माफी मागण्याची मागणी केली.
लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘लिओ’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारणार्या मन्सूर अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काश्मीरमधील चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकात तृषासोबत कोणतेही दृश्य न ठेवण्याबाबत अपमानजनक टिप्पणी केली होती. तृषा म्हणाली की खानने केलेली टिप्पणी ‘लैंगिक, अपमानजनक, स्त्रीद्वेष्टी आणि घृणास्पद’ होती. आता यापुढे मी कधीही मन्सूर अली खानसोबत काम करणार नाही.
तृषाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. तृषा व्यतिरिक्त खुशबू सुंदर आणि रोजा या दोन अभिनेत्रींविषयी देखील मन्सूर अली खानने अशाच प्रकारची टिप्पणी केली होती, असे सांगून जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत त्याचे सदस्यत्व तात्पुरते निलंबित करण्याचा विचार एसआयएए करीत आहे, असे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.