किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलदेवरिया, ३१ ऑक्टोबर – लव्ह जिहादच्या सतत वाढत असलेल्या घटनांवर कायमचा आळा घालण्यासाठी आपले सरकार लवकरच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शनिवारी केली. मुलींना फसवाल तर तुमचा थेट ‘राम नाम सत्य है’ होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
येथे निवडणूक सभेला संबोधित करताना आदित्यनाथ यांनी लव्ह जिहादसारख्या घटनांमध्ये सामील असणार्या आणि त्याला प्रोत्साहन देणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या भगिणींच्या आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेशी खेळ करणार्यांनी आताच सुधारावे; अन्यथा हा नवा कायदा त्यांना कायमची अद्दल घडवेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने, केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे वैध नसल्याचा निर्वाळा दिला आहे. न्यायालयाच्या या मताचे आम्ही स्वागत करतो. लव्ह जिहादवर कायमचा अंकुश घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही आज मी तुम्हाला देत आहो.
यावेळी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांचाही समाचार घेतला. माझ्या सरकारने गुंडांविरोधात कठोर मोहीम हाती घेतल्याने यादव यांच्या पोटात दुखू लागले आहे. या गुंडांना त्यांच्या सरकारच्या काळात अभय दिले जात होते. या गुंडांचा वापर राज्यात दंगली करण्यासाठी होत असल्याचे अनेक चौकशी अहवालातून समोर आले आहे. या राजकीय गुंडांचा माझे सरकार कायमचा बंदोबस्त करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.