किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसुरत, (२७ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौर्यावर आहेत. सायन्स सिटी, अहमदाबाद येथे आयोजित रोबोटिक प्रदर्शनातही ते सहभागी झाला होता. यासोबतच त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचेही उद्घाटन केले. रोबोटिक प्रदर्शनात पीएम मोदींनी उपस्थित कर्मचार्यांशी संवाद साधला आणि तिथे ठेवलेल्या सर्व रोबोटिक गोष्टींचा आढावाही घेतला.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन करताना पीएम मोदी म्हणाले की त्यांनी एक बीज पेरले होते जे आता वटवृक्ष झाले आहे. समिटमध्ये उपस्थित लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, ’व्हायब्रंट गुजरात हा केवळ ब्रँडिंग कार्यक्रम नाही तर त्याहूनही अधिक म्हणजे तो एक सहभागाचा कार्यक्रम आहे. माझ्यासाठी, हा माझा आणि गुजरातच्या ७ कोटी नागरिकांचा आणि त्यांच्या क्षमतेचा संबंध आहे. २० वर्षांपूर्वी आपण एक बीज पेरले होते, जे आज मोठे आणि चैतन्यमय वटवृक्ष बनले आहे.’’ ते पुढे म्हणाले, ’’मला तेव्हा मुख्यमंत्री म्हणून फारसा अनुभव नसला तरी. पण माझा गुजरातच्या लोकांवर अतूट विश्वास होता. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. गुजरातच्या विकासाबाबत काँग्रेसने उदासीनता दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला. पीएम मोदी म्हणाले, गुजरातच्या विकासाबाबत तत्कालीन केंद्र सरकारने उदासीनता दाखवली, अशा वातावरणात व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले होते. परदेशी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये न जाण्याची धमकी देण्यात आली होती, एवढ्या भीतीनंतरही परदेशी गुंतवणूकदार गुजरातमध्ये आले.
२००९ मधील जागतिक मंदीच्या काळातही या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही पीएम मोदी म्हणाले. व्हायब्रंट गुजरातच्या यशामध्ये नियोजन, कल्पनाशक्ती आणि अंमलबजावणी यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींसोबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही सामील झाले होते. २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिली व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट आयोजित करण्यात आली होती.